हसण्यासाठी जन्म आपुला
A multifaceted person
Sunil Bhatambrekar is a mechanical engineer and designer with over four decades of experience, and a Marathi author, artist and speaker. His books, blogs, drawings and paintings find the extraordinary in everyday life.

Ten books of laughter, people and translation
Eight original collections, many illustrated in his own hand, and two translations.
A mechanical engineer who always wants to try creativity in Design Engineering, drawing, painting and literature
Humorist & essayist
Lalit essays whose humour, as one foreword puts it, “never stings; it leaves a smile on your cheek.”
Cartoonist & sketch artist
He illustrates his own books, draws cricket cartoons for Diwali issues and makes detailed pencil studies.
Translator
Marathi to English and English to Marathi: Owe You, Mother and Man Ha Mogara.
Engineer & technical consultant
His engineering career took him around the world. He is currently an advisor at the C4i4 Lab, and one of the directors of Primus Consultancy.
What fellow writers say about his pen
सुनील भातंब्रेकर ह्यांची खुमासदार शैली वाचकांशी सहज संवाद साधते.
कोणतीही साहित्यकृती समृद्ध असल्याशिवाय साहित्य या पदवीपर्यंत जाऊ शकत नाही. श्री. सुनील भातंब्रेकर ह्यांच्या लिखाणात समृद्ध आशय आहे.
सामान्यात असामान्यत्व शोधणारा आणि माणसाच्या भोवतालच्या जीवनाचे सत्य शोधणारा हा प्रतिभावंत लेखक वर्तमान जीवनातील विसंगती, व्यंग, उपहास यांचा अचूक वेध घेताना विनोद निर्मिती आणि मार्मिकता यांचा उत्तम तोलही सांभाळतो. अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक भान यामुळे श्री. भातंब्रेकर यांच्या लेखनाला आलेली सुंदरता वाचकांच्या मनाची सुंदरता वाढवणारी झाली आहे.
सुनील भातंब्रेकरांच्या लिखाणात जेव्हा जेव्हा विनोद येतो तेव्हा तेव्हा तो सहजपणे आलेला आढळतो. लेखांच्या मूळ गाभ्यात तो विनोद ओढून-ताणून जबरदस्तीने कोंबल्याची जाणीव कुठेही होत नाही.
आचार्य अत्रे म्हणतात, देवाधिकांनी समुद्रमंथन केले आणि त्यांना चौदा रत्नं सापडली पण विनोद नावाचे पंधरावे रत्न त्यांना सापडले नाही कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचे मंथन करावे लागते. सुनील भातंब्रेकर यांनी ते केले आहे. म्हणूनच ते विनोदाचा शिडकावा असलेले लेखन करू शकले.
श्री. सुनील भातंब्रेकर ह्यांच्या शब्दचित्रातून जाताना एक वेगळाच अनुभव मिळत जातो. एखाद्या दर्दी आणि जाणकार लेखकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने केवळ शब्दांच्या माध्यमातून हे साध्य केले आहे. विशेषणांची मुबलकता ही भातंब्रेकरांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
आपल्याला न जाणवलेले अनेक पैलू लेखकाने कधी गमतीशीर पद्धतीने तर कधी चिंतन मनाने उलगडले आहे.
सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधण्याची वृत्ती यातून ‘मिक्स व्हेज’ हा ललित लेखांचा संग्रह सिद्ध झाला आहे.
कल्पनाचमत्कृती, शब्दखेळ, मार्मिक निरीक्षणं, संदर्भाची समृद्धी यामुळे ‘दादरायण’ वाचणं आनंदाचं ठरतं.
Letters from readers · वाचकांचे अभिप्राय
सुनील, तुझे पुष्पगुच्छ पुस्तक वाचले. ललित लेखांचे एक छान, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले. प्रत्येक लेखामध्ये तुझा सखोल अभ्यास व सूक्ष्म अवलोकन पदोपदी दिसून येते. विषयाची मांडणी मनाला भावते. एका विषयात किती कंगोरे असू शकतात हे तुझ्या लेखातून कळतं.
पत्रास कारण की, धम्मक लाडू, जत्रा - एक अद्भुत रस, पत्ते एक कुटणे, शिक्षण व शिक्षा या लेखांमधून आपल्या बालपणीच्या सुखद आठवणी जागृत होतात व आपण त्या लेखांमध्ये समरस होतो. उत्तरदर्शिका हा लेख वेगळाच आहे. विशेषतः या लेखांमध्ये दूध, मोलकरणीचा खाडा कसा लिहितात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. वाचताना खूप मनोरंजन झाले. प्रत्येक लेखाच्या समारोपात जाता जाता एक चांगला संदेश दिला आहे.
या ताणतणावाच्या जीवनात हे पुस्तक वाचल्यावर एक निर्भेळ आनंद नक्की मिळेल. ललित लेखन करणारी माणसे सध्या खूप कमी आहेत. तुझ्याकडून असेच चांगले लेखन घडो ह्या शुभेच्छा व सदिच्छा.
महोदय, दिव्य मराठीच्या पुरवणी मधील आपला “जशी दृष्टी तशी सृष्टी” लेख वाचला तो खूप मनाला भिडला. आपण विषद केलेला जीवनविषयक दृष्टिकोन अत्यंत विचारणीय.
आपण क्षणभर चाचपडत चालणं आणि दृष्टीहीन माणसाचं आयुष्य घालवणं हा विचार देखील अंगावर काटा आणतो. असा दृष्टिकोन समाजासमोर ठेवलात हे कौतुकास्पद.
विषयाचं शीर्षकच इतकं अप्रतिम की ‘सहनशीलतेचा वारसा स्त्रीत्वातूनच’ हे सार पूर्णत्वाने व्यक्त होतं. विषयाची मांडणीही अत्यंत उत्तम आणि हृदयाला भिडणारी आहे. सुनील, तुझ्या लेखनासाठी अभिनंदन शब्दसुद्धा अपुरीच पडतात.
तुझे लिखाण हलके फुलके
परी त्यात दिसे कल्पकता
निर्भेळ कशास म्हणावे
ती वहात असते सरिता!
हास्यानंद दिवाळी अंकात तुझा “खड्ड्यात जा” हा लेख वाचला. साधा खड्डा, पण तू त्यात डोकावून, खणून जे शब्दरुपी माणिक मोती बाहेर काढून सर्वांसमोर मांडलेस त्यास तोड नाही.
Recent essays
Short Marathi pieces from his blog and columns, best read slowly with a cup of chai.
धडक पक्ष्यांची
Why birds never collide‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…
Read essayसर्टिफिकेट
A certificate for everythingमध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…
Read essayभजे
Bhaji — the king of romantic snacksआपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…
Read essayDrawings and paintings
Portraits, pencil sketches, landscapes and still lifes, along with calligraphy, caricatures and the cricket cartoons he drew for the Chaprak Diwali Ank.
View drawings & paintingsOn air, on stage, on camera
Conversations on Akashvani Pune, book launches and career talks.
अमृत कलश — Interview on Akashvani Pune
All India Radio Pune presents the well-known author and AI expert in conversation with Praveen Kulkarni. Aired 12 Aug 2025.
हास्यरंग — Book introduction
जीवनातील ताणतणाव विसरा आणि मनसोक्त हसा! Chaprak introduces ‘Hasyarang’. January 2026.
Japan, Innovation and Life — Success Stories (Part 1)
From Parbhani to a polytechnic, Pune’s industrial belt and Japan — his journey as an engineer. With Balkrishna Kate, May 2023.
Bring laughter to your next event
Book launches, literary festivals, college inductions and talks on careers, innovation or AI. Write to him directly.

