हसण्यासाठी जन्म आपुला
एक बहुआयामी व्यक्ती
सुनील भातंब्रेकर हे चार दशकांहून अधिक अनुभव असलेले यांत्रिकी अभियंता व डिझायनर, तसेच मराठी लेखक, चित्रकार आणि वक्ते आहेत. त्यांची पुस्तके, ब्लॉग, रेखाचित्रे आणि चित्रे रोजच्या जगण्यातील असामान्यत्व शोधतात.

हास्य, माणसे आणि अनुवादाची दहा पुस्तके
आठ स्वलिखित संग्रह — बहुतेक स्वतःच्या रेखाचित्रांनी सजलेले — आणि दोन अनुवाद.
डिझाईन अभियांत्रिकी, चित्रकला आणि लेखन- ह्यामध्ये सतत सर्जनशीलता शोधणारा अभियंता
विनोदी व ललित लेखक
एका प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, त्यांचा विनोद “बोचरा नाही; तो गालावर स्मितरेषा उमटवणारा आहे.”
व्यंगचित्रकार व रेखाचित्रकार
स्वतःच्या पुस्तकांची रेखाचित्रे, दिवाळी अंकांसाठी क्रिकेट व्यंगचित्रे आणि बारकाईने केलेली पेन्सिल रेखाचित्रे.
अनुवादक
मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत: Owe You, Mother आणि मन हा मोगरा.
अभियंता व तांत्रिक सल्लागार
इंजिनिअरिंग क्षेत्रातील कारकिर्दीने त्यांना जगभर नेले. सध्या ते C4i4 लॅबमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. शिवाय ते प्रायमस कंसल्टंसीचे एक संचालक आहेत.
त्यांच्या लेखणीविषयी साहित्यिक म्हणतात
सुनील भातंब्रेकर ह्यांची खुमासदार शैली वाचकांशी सहज संवाद साधते.
कोणतीही साहित्यकृती समृद्ध असल्याशिवाय साहित्य या पदवीपर्यंत जाऊ शकत नाही. श्री. सुनील भातंब्रेकर ह्यांच्या लिखाणात समृद्ध आशय आहे.
सामान्यात असामान्यत्व शोधणारा आणि माणसाच्या भोवतालच्या जीवनाचे सत्य शोधणारा हा प्रतिभावंत लेखक वर्तमान जीवनातील विसंगती, व्यंग, उपहास यांचा अचूक वेध घेताना विनोद निर्मिती आणि मार्मिकता यांचा उत्तम तोलही सांभाळतो. अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक भान यामुळे श्री. भातंब्रेकर यांच्या लेखनाला आलेली सुंदरता वाचकांच्या मनाची सुंदरता वाढवणारी झाली आहे.
सुनील भातंब्रेकरांच्या लिखाणात जेव्हा जेव्हा विनोद येतो तेव्हा तेव्हा तो सहजपणे आलेला आढळतो. लेखांच्या मूळ गाभ्यात तो विनोद ओढून-ताणून जबरदस्तीने कोंबल्याची जाणीव कुठेही होत नाही.
आचार्य अत्रे म्हणतात, देवाधिकांनी समुद्रमंथन केले आणि त्यांना चौदा रत्नं सापडली पण विनोद नावाचे पंधरावे रत्न त्यांना सापडले नाही कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचे मंथन करावे लागते. सुनील भातंब्रेकर यांनी ते केले आहे. म्हणूनच ते विनोदाचा शिडकावा असलेले लेखन करू शकले.
श्री. सुनील भातंब्रेकर ह्यांच्या शब्दचित्रातून जाताना एक वेगळाच अनुभव मिळत जातो. एखाद्या दर्दी आणि जाणकार लेखकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने केवळ शब्दांच्या माध्यमातून हे साध्य केले आहे. विशेषणांची मुबलकता ही भातंब्रेकरांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
आपल्याला न जाणवलेले अनेक पैलू लेखकाने कधी गमतीशीर पद्धतीने तर कधी चिंतन मनाने उलगडले आहे.
सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधण्याची वृत्ती यातून ‘मिक्स व्हेज’ हा ललित लेखांचा संग्रह सिद्ध झाला आहे.
कल्पनाचमत्कृती, शब्दखेळ, मार्मिक निरीक्षणं, संदर्भाची समृद्धी यामुळे ‘दादरायण’ वाचणं आनंदाचं ठरतं.
वाचकांचे अभिप्राय
सुनील, तुझे पुष्पगुच्छ पुस्तक वाचले. ललित लेखांचे एक छान, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले. प्रत्येक लेखामध्ये तुझा सखोल अभ्यास व सूक्ष्म अवलोकन पदोपदी दिसून येते. विषयाची मांडणी मनाला भावते. एका विषयात किती कंगोरे असू शकतात हे तुझ्या लेखातून कळतं.
पत्रास कारण की, धम्मक लाडू, जत्रा - एक अद्भुत रस, पत्ते एक कुटणे, शिक्षण व शिक्षा या लेखांमधून आपल्या बालपणीच्या सुखद आठवणी जागृत होतात व आपण त्या लेखांमध्ये समरस होतो. उत्तरदर्शिका हा लेख वेगळाच आहे. विशेषतः या लेखांमध्ये दूध, मोलकरणीचा खाडा कसा लिहितात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. वाचताना खूप मनोरंजन झाले. प्रत्येक लेखाच्या समारोपात जाता जाता एक चांगला संदेश दिला आहे.
या ताणतणावाच्या जीवनात हे पुस्तक वाचल्यावर एक निर्भेळ आनंद नक्की मिळेल. ललित लेखन करणारी माणसे सध्या खूप कमी आहेत. तुझ्याकडून असेच चांगले लेखन घडो ह्या शुभेच्छा व सदिच्छा.
महोदय, दिव्य मराठीच्या पुरवणी मधील आपला “जशी दृष्टी तशी सृष्टी” लेख वाचला तो खूप मनाला भिडला. आपण विषद केलेला जीवनविषयक दृष्टिकोन अत्यंत विचारणीय.
आपण क्षणभर चाचपडत चालणं आणि दृष्टीहीन माणसाचं आयुष्य घालवणं हा विचार देखील अंगावर काटा आणतो. असा दृष्टिकोन समाजासमोर ठेवलात हे कौतुकास्पद.
विषयाचं शीर्षकच इतकं अप्रतिम की ‘सहनशीलतेचा वारसा स्त्रीत्वातूनच’ हे सार पूर्णत्वाने व्यक्त होतं. विषयाची मांडणीही अत्यंत उत्तम आणि हृदयाला भिडणारी आहे. सुनील, तुझ्या लेखनासाठी अभिनंदन शब्दसुद्धा अपुरीच पडतात.
तुझे लिखाण हलके फुलके
परी त्यात दिसे कल्पकता
निर्भेळ कशास म्हणावे
ती वहात असते सरिता!
हास्यानंद दिवाळी अंकात तुझा “खड्ड्यात जा” हा लेख वाचला. साधा खड्डा, पण तू त्यात डोकावून, खणून जे शब्दरुपी माणिक मोती बाहेर काढून सर्वांसमोर मांडलेस त्यास तोड नाही.
अलीकडील लेख
ब्लॉग आणि सदरांमधील छोटे लेख — गरम चहाचा घोट घेत निवांत वाचावेत असे.
धडक पक्ष्यांची
‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…
लेख वाचासर्टिफिकेट
मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…
लेख वाचाभजे
आपल्या महाराष्ट्रीयन जेवणातल्या प्रत्येक पदार्थाला नुसती वेगळी चवच नसते तर तो पदार्थ मनामध्ये वेगळी रसोत्पत्ति देखील करतो. आता हेच पाहा ना - पोळी, लापशी, साधं व…
लेख वाचाचित्रे आणि रेखाचित्रे
व्यक्तिचित्रे, पेन्सिल स्केचेस, निसर्गचित्रे आणि स्थिरचित्रे; त्याचबरोबर कॅलिग्राफी, कॅरिकेचर्स आणि चपराक दिवाळी अंकासाठी काढलेली क्रिकेट व्यंगचित्रे.
चित्रे पाहाआकाशवाणीवर, व्यासपीठावर, कॅमेऱ्यासमोर
आकाशवाणी पुणेवरील मुलाखती, पुस्तक प्रकाशने आणि करिअरविषयक व्याख्याने.
अमृत कलश — आकाशवाणी पुणेवरील मुलाखत
सुप्रसिद्ध लेखक आणि एआय तज्ज्ञ म्हणून आकाशवाणी पुणेने घेतलेली मुलाखत; मुलाखतकार प्रवीण कुलकर्णी. प्रसारण: १२ ऑगस्ट २०२५.
हास्यरंग — पुस्तक परिचय
जीवनातील ताणतणाव विसरा आणि मनसोक्त हसा! चपराकतर्फे ‘हास्यरंग’चा परिचय. जानेवारी २०२६.
जपान, नवोन्मेष आणि जीवनप्रवास — Success Stories (भाग १)
परभणी ते पॉलिटेक्निक, पुण्याचा औद्योगिक पट्टा आणि जपान — एका अभियंत्याचा प्रवास. बाळकृष्ण काटे यांच्यासोबत, मे २०२३.
तुमच्या पुढच्या कार्यक्रमात हास्य फुलवा
पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलने, महाविद्यालयीन कार्यक्रम आणि करिअर, नवोन्मेष किंवा एआयवरील व्याख्याने — थेट संपर्क साधा.

